दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर :राज्यात जवळपास आठशेहून अधिक बोगस शाळांवर कारवाईचा हातोडा पडणार आहे. याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सर्व उपसंचालकांना संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांवर शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे दंड आकारणे, एफ आय आर गुन्हा दाखल करणे, शाळा बंद करणे आदी कारवाई ता. २५ एप्रिलपुर्वी करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.आयुक्त मांढरे यांनी विभागीय उपसंचालकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील शाळांना शासनाकडून देण्यात आलेले परवानगी प्रमाणपत्र किंवा परवानगी आदेश, स्वमान्यता प्रमाणपत्र आदी संबंधित दस्तऐवजांची वैधता तपासण्यासाठी सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन, आयुक्त शिक्षण कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत आपणास वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत.या समितीमार्फत आपणांस देण्यात आलेल्या
सूचनांनुसार आपल्या विभागातील शाळांचे वैधता
प्रमाणपत्रांची तपासणी पूर्ण करून अंतिम अहवाल
या कार्यालयास ता. १८ एप्रिलपर्यंत सादर
करण्यात यावा. यानंतर या प्रकरणी कार्यवाही
करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाच्या व्यतिरिक्त अन्य मंडळांच्या शाळांकडे एनओसी, संलग्नता प्रमाणपत्र आदी नसल्यास अशा शाळांना आरटीई २००९ व संबंधित शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
• मान्यताप्राप्त सीबीएसई शाळा
• सना इंटरनॅशनल स्कूल, ब्रम्हपुरी
• पोदार इंटरनॅशनल स्कुल, पुर्णा रोड
नागार्जुना पब्लिक स्कुल, कौठा
• ग्यानमाता विद्या विहार, कामठा रोड
केंद्रीय विद्यालय, रेल्वे कॅम्पस
• आक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल, वाडी
होरायझन डिसकव्हरी अकॅडेमी, विष्णुपुरी
• आक्सफर्ड द ग्लोबल स्कुल, पुयणी
शाकुंतल स्कुल फॉर एक्सलन्स, मालेगाव रोड
किड्स किंगड्म पब्लिक स्कुल, खुरगाव
• पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुल,
• सांदिपनी इंटरनॅशनल स्कुल, गाडेगावशिवप्रसाद इंटरनॅशनल स्कुल आणि ज्यु. कॉलेज, भवनवाडी, मुखेड
• केंद्रीय विद्यालय, केंद्रीय राखीव पोलिस फोर्स, मुदखेड
• जेनीअस किड्स इंटरनॅशनल स्कुल, माहूर
• पॅनासिया इंटरनॅशनल स्कुल, जानापुरी
• एकलव्य रेसिडेन्शिअल स्कुल, सहस्त्रकुंड
• ग्रोव एन ग्लो पब्लिक स्कूल
• सप्तगीरी पोदार लर्न स्कूल, देगलूर
• नवोदय विद्यालय, शंकरनगरबोगस शाळांवरील कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणी दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी.