दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी-
भूम:- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त आष्टा येथील भीम नगर, विद्यालय, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सुनिल जाधव, ग्रामविस्तार अधिकारी संजय केंद्रे, सदस्य रवींद्र वाघमारे, प्रकाश वाघमारे, संभाजी गिलबिले, तात्यासाहेब अष्टेकर, व्हाईस चेअरमन तानाजी गिलबिले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी लक्ष्मण माळी, जयराम गिलबिले, राजकुमार घरत, अरुण काकडे, बाळासाहेब वाघमारे, सुग्रीव कोळी,अरुण वाघमारे,सोमनाथ माळी,गणेश घाडगे ,मयूर कवडे, भीमराव सावंत उपस्थित सर्व समाज बांधव , महिला भगिनी, आष्टा ग्रामस्थ यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.