
दैनिक चालू वार्ता.
प्रा.मिलिंद खरात.
पालघर प्रतिनिधी.
भिवंडी.
जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी ता.भिवंडी,जि.ठाणे येथे 26 नोव्हेंबर 2021,रोजी सकाळी ठीक 11 वाजता संविधान गौरव दिनानिमित्त *माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमांतर्गत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर असे तीन दिवस अनेक उपक्रम राबवून संविधानाचा जागर करण्यात आला.यात रांगोळी,पोस्टर्स, भित्तिपत्रक ,चित्रकला,संविधान घोषवाक्य व संविधान सन्मान प्रचार रॅली इत्यादी उपक्रमातून संविधानाचा जागर करण्यात आला*
*26 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान प्रचार रॅली काढण्यात आली.यामध्ये सर्व विद्यार्थी,पालक, शाळाव्यवस्थापन समिती,ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन संविधाना विषयी अनेक घोषवाक्य,घोषणा देऊन संविधानाचा जागर व जयजयकार करण्यात आला*
तद्नंतर विश्वरत्न, भारतीय संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार व संविधान पुस्तिकेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
सहशिक्षका दिलशाद शेख मॅडम यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले उपस्थित विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ पाहुणे ,शिक्षक यांनी सहभाग घेतला.तसेच संविधानातील मूलभूत कर्तव्य यांचे वाचन करून ओळख करून दिली.
*उपस्थित सर्वांचे स्वागत संविधान प्रास्ताविका,पुस्तक व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले*
उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव व कास्ट्राईब कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढे यानी संविधानावर विचार मांडून शुभेच्छा दिल्या.*कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी संघर्ष समिती ठाणे जिल्हा सदस्या, शिक्षिका साधना चोधरी-भेरे होत्या. त्यानी भारतीय संविधानाने दिलेले हक्क व अधिकार या विषयावर आपले विचार मांडले.यावेळी त्यांनी सांगितले की,आपल्याला सर्व काही भारतीय संविधानाने दिलेले आहे.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही .असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. म्हणून आपल्याला भारतीय संविधानात कलम 21 क नुसार शिक्षणाचा हक्क दिलेला आहे.नुसता हक्क दिलेला नाही तर शिक्षण सक्तीचे व मोफत दिलेले आहे.विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात आपली जन्मल्या पासून ते मरेपर्यंत सर्व सोय केलेली आहे.म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी महामानव आहेत.तेच संविधानाचे शिल्पकार आहेत.अशा प्रकारे अनेक मुद्द्याना स्पर्श करून भारतीय संविधानावर अतिशय मौलिक विचार मांडले*
*सहशिक्षक अशोक गायकवाड यांसकडून संविधान गौरव दिनानिमित्त चाॅकलेट व पेन, पेन्सिल याचे वाटप करण्यात आले*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी कले.तर आभार मुख्याध्यापक जगदीश जाधव यांनी मानले*
*कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी संघर्ष समिती ठाणे जिल्हा सदस्या साधना चौधरी-भेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभाग कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संतोष गाढे,ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव, शंभू प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा.निवृत्ती मगर,समतासैनिक दल मुंबई प्रांत डिव्हिजन सुनिल सोळंकी,डोहळे शाळेचे सहशिक्षक रामकृष्ण सिनकर, जाधव ताई,शाळाव्यवस्थापन अध्यक्ष विष्णू मोरे,माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते*