
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड-
आर्य वैश्य मंगल कार्यालय मुखेड येथे तालुकास्तरीय गुरु गौरव पुरस्कार देण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी उंद्री प.दे.येथील कार्यरत मुख्याध्यापक श्री कोंदापूरे सर यांच्या अथक परिश्रमातून सहशिक्षिका सौ. सविता जगन्नाथ खोले मॅडम यांना आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी गट शिक्षण आधिकारी कैलास होनदरने ,रामोड सर, आशोक चव्हाण, खुशालराव पाटील, लक्ष्मणराव पाटील, बाबुराव देबडवार, डॉ माधव पाटील, अशोक गजलवाड, किशोरसिंह चौहान , डॉ.पुंडेसाहेब, व्यंकटराव पाटील ,व्यंकटराव लोहबंदे ,शेखर देशमुख ,संग्राम माळगे, सुधीर चव्हाण,समिर गजगे, आनंदराव पाटील, नागोराव पाटील, राजू घोडके,बालाजी पाटील, गोटू पाटील, उंद्री प.दे.येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका सौ.श्रीरामे मॅडम, अंतेश्वर पाटील, किरण पाटील,कमलाकर अगदे, नागेश गोपनर ,विजय स्वामी, शिवा सम्राळे ,अनिकेत कांबळे, राजू राठोड, सचिन पवार आदी उपस्थित होते.