
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी अंबड -ज्ञानेश्वर साळुंखे
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा सोनी रेसिडेन्सी श्रीहरी नगर नवीन मोंढा रोड जालना येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जालना जिल्ह्यातील भाविक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते .जालना येथे स्व-स्वरूप संप्रदाय जिल्हा जालना च्या वतीने शुक्रवारी जगद्गुरु स्वामी नरेंद्रचार्य जी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेल्या दहा दिवसापासून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरू केली होती शुक्रवारी सकाळी पालखी मिरवणुक काढण्यात आली. नरेंद्र स्वामींच्या गजराने जालन्यामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या या कार्यक्रमांमध्ये नानीज हुन आलेले प्रबोधनकार कुलकर्णी यांनी सर्वांना भक्तिमय वातावरणात प्रबोधन केले, हजारो महिला पुरुष भाविकांनी उपासक दीक्षा घेतली, यावेळी सामाजिक उपक्रम अंतर्गत 8 तालुक्यातील गरजू महिलांना सर्वउपयोगी घरघंटी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली .
या सोहळ्याला जालना जिल्ह्याचे आमदार कैलास गोरंट्याल,भाजपा उपाध्यक्ष भास्करराव दानवे,धनराज काबलीये, तुलजेश चौधरी , दत्ता घुले, वसंत शिंदे,कपिल दहेकर,गोवर्धन कोल्हे,दीपक भुरेवाल मदन भगत,
मराठवाडा पीठ प्रमुख गणेश मोरे, जालना जिल्हा निरिक्षक विजय देशपांडे, जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार जिल्हा सेवा समिती महोत्सव सेवा समिती च्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.