दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;;;;;
आर्णी तालुक्यात येत असलेल्या आयता गाव हे पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी सदोबा परिसरातील मौजा आयता येथील योगेश जोगमोडे या युवकाचा हल्ल्यात मृत्यू झाला असून,ही घटना १० एप्रिल रोजी ८:३० वाजता मौजा आयता येथे घडली होती,मृतक योगेशच्या वडिलांच्या बयानावरून या मृत्यू प्रकरणातील अजून ३ आरोपींना अटक करण्यात आली,मृत्यू प्रकरणातील आरोपी राजू पंजवाणी रा.आयता याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून,न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाचा PCR दिला आहे,या प्रकरणातील ६ आरोपींना या अगोदर MCR तर ५ आरोपींना दोन दिवसाचा PCR देण्यात आला असल्याची माहिती पारवा पोलीस सूत्रांनी दिली आहे,मृतक योगेशच्या वडिलांच्या बयानावरून आयता राजू पंजवाणी यांना काल रात्री पारवा पोलिसांकडून अटक करण्यात आली,आयता या गावामध्ये दोन गट असुन,सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटाकडून नेहमीच राजकीय वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो,मात्र या राजकीय वर्चस्वाची तीळ मात्र भनक नसलेल्या मृतक योगेशचा बळी गेला असल्याची खंत वडिलांनी व्यक्त केली,मृतक योगेशला सामाजिक कार्याची आवड असल्याने, योगेश हा नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत होता,मात्र गावातील काही राजकारणी लोकांना हे खटखटत होतं,त्यामुळे नेहमीच योगेशला मारण्यासाठी अनेकदा गावातील राजकीय लोकांकडून कटकारस्थान रचल्या जात होते, गावातील राजकीय वर्चस्वामुळे माझ्या मुलाचा बळी गेलेला आहे,माझ्या मुलावर राजकीय वर्चस्वातून हल्ला घडला असल्याची कबुली मृतक योगेशच्या वडिलांनी पोलीस चौकशीच्या बयानामध्ये दिली आहेत,सामाजिक कार्यात मृतक योगेश हा सक्रिय असल्यामुळे वरील सर्व आरोपींनी संगणमत करून,मृतक योगेशला मारण्यासाठी मागील अनेक दिवसापासून कटकारस्थान चालू होते,मात्र मृतक योगेश मितभाषी व हुशार असल्याने विरोधकांच्या कोणत्याच कटकारस्थानात येत नव्हता,मात्र यावेळेस मंदिराच्या शेतीचा विषय समोर करून,काहीतरी खोटं प्रकरण उपस्थित करून माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाच्या डोक्यावर बेदम मारहाण करून त्याला जीवाची ठार मारण्यास आरोपी यशस्वी झाले असल्याची ही कबुली योगेशच्या वडिलांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली,या प्रकरणात एकूण 11 आरोपींना ताब्यात घेतले असून,राजू पंजवाणी रा.आयता यांना आज तर सचिन दिलीप राठोड रा.अंतरंगाव,नितेश रामचंद्र चव्हाण अंतरंगाव यांना काल न्यायालयात हजर करण्यात आले होते,या प्रकरणातील ६ आरोपींना MCR तर ५ आरोपींना दोन दिवसासाठी PCR देण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनांनी दिली असून पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गजानन गजभारे सपोनि दूरक्षेत्र सावळी सावळी करीत आहे.
__________________________________
आयता गावामध्ये दोन गट असून, त्यामध्ये मृतक योगेश जोगमोडे यांचे वडील अशोक जोगमडे यांचा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप सदर आरोपीचा असल्याने दोन्हीही गटांमध्ये रामनवमी, पुंडलिक बाबा यात्रा,कबड्डी सामने, हनुमान मंदिराच्या शेतीच्या विषयात कधीच एकमत होत नव्हते,त्यामुळे दोन्ही गटात वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत होते,त्यामुळे होऊ शकतो अशातूनच हा प्रकार घडला असेल,
गजानन गजभारे (सपोनि) पारवा दूरक्षेत्र सावळी सदोबा
__________________________