दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==================
देवणी : गोविंदराव भोपणीकर यांनी देवणी सारख्या ग्रामीण भागात लावलेलं शैक्षणिक लहानस रोपटं आज रसिका महाविद्यालयाच्या माध्यमातून वटवृक्ष होऊन बहरताना दिसतेय
रसिका महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन पालकात विश्वास निर्माण केला आहे म्हणून या रसिका महाविद्यालयाची प्रगती होऊन लहानस शैक्षणिक रोपटं आज वटवृक्ष होऊन बहरत असल्याचे मत रसिका शैक्षणिक संकुलाच्या नूतन इमारतीच्या शानदार भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी देवणी येथे व्यक्त केले
स्व आबासाहेब भोपणीकर यांच्या संकल्पनेतुन रसिका शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी सर्वसामान्य गरीब लोकांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोय व्हावी म्हणून आबासाहेब यांनी या रसिका महाविद्यालयाची उभारणी केली आबासाहेब भोपणीकर यांच्यावर नियतीने घाला घातला आबासाहेब यांचे स्वप्न अधुरे राहिले आबासाहेब भोपणीकर यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी गोविंदराव भोपणीकर यांच्या आशीर्वादाने गजानन भोपणीकर यांनी शैक्षणिक कावड आपल्या खांद्यावर घेईन भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे मा दिलीपराव देशमुख यांनी सांगितले अनेक राजकीय लोकांच्या शैक्षणिक संस्था आहेत परंतु त्याकडे त्यांचे लक्ष राहते किंवा नाही पालकांचा विश्वास बसत नाही म्हणून शिक्षण संस्था संख्यात्मक न राहता गुणात्मक ठरल्या पाहिजे असे नेत्रदीपक काम रसिका महाविद्यालय करीत असल्याचे मा देशमुख यांनी सांगितले
देवणी तालुक्यात एकमेकांच्या पायात पाय घालून मागे ओढण्याची प्रवृत्ती बळावली आहे यात कोणाचेही हित होत नाही एकमेकांच्या हाताला हात धरून एकमेकांची प्रगती साधली तर सर्वांगीण विकास होईल देवणी तालुक्यातुन गजानन भोपणीकर यांच्या माध्यमातून तरुण पिढीतील नेतृत्व पुढे येत आहे त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करावी असेही सहकार महर्षी माजी राज्यमंत्री मा दिलीपराव देशमुख यांनी सांगितले
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार त्रिंबकनाना भिसे,लातूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मा श्री गोविंदराव भोपणीकर, जागृती कारखान्याचे उपाध्यक्ष लक्षीमन रावजी मोरे, लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे,लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, जागृती चे संचालक संभाजी रेड्डी, लातूर जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, रमेश बिरादार, दिलीप पाटील नागराळकर, भगवान पाटील विजयनगरकर,देवणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ऍड अजित बेळकोने, रामराव बिरादार भोपणीकर, मधुकर लांडगे, कुशावर्ता बेळे , शिवाजी कांबळे, सतीश पाटील इत्यादी ची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव गजानन भोपणीकर यांनी केले रसिका शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून केजी टू पीजी पर्यंत देण्यात येत असलेल्या दर्जेदार शिक्षणाची माहिती दिली तसेच मा श्री गोविंदराव भोपणीकर यांनी मनोगत व्यक्त करतांना या संस्थेच्या निर्मिती मागील उद्धेश व मागील 12 वर्षात संस्थेने केलेले कार्य या विषयी सविस्तर माहिती दिली या संस्थेच्या सर्वांगीण विकासासामध्ये मा दिलीपराव देशमुख यांचे खूप मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन यावेळी केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा श्री अशोक पाटील निलंगेकर म्हणाले की निलंगा, शिरूर अनंतपाळ, व देवणी तालुक्याच्या विकासासाठी विकासरत्न लोकनेते स्व. विलासराव देशमुख ,स्व.डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, मा शिवराज पाटील चाकूरकर, यांचे योगदान फार मोठे आहे त्यांच्या विचारांचा व कार्याचा वसा आपण सर्वांनीअंगीकारला पाहिजे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सर्वांनी कार्य केले पाहिजे तरच सर्वांगीण विकास साधता येईल असे प्रतिपादन केले तसेच या शैक्षणिक संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु प्रतिक्षा लोहकरे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे यांनी मानले