
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
देवणी: देवणी तालुक्यातील वलांडी येथे रमजानच्या पवित्र महिन्यांमध्ये इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने सर्व समाजातील बांधवांना एकत्रित करून पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन मजली से ऐतिहादुल मुस्लिम (M I M) पक्षाच्या वतीने मैनोदींन मस्जिद वलांडी येथील काल दिनांक 16 एप्रिल रविवारी रोजी सायंकाळी 6 :45 वाजता यावर्षीही इफ्तार
पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पवित्र रमजान महिन्यात 2023 च्या इफ्तार पार्टीला शहरातील सर्व समाज बांधवांना M I M पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने इफ्तार पार्टीस निमंत्रित करण्यात आले होते.पवित्र रमजान महिन्यातील 24 वा रोजा ( उपवास) दिवशी इप्तार पार्टी झाली.या इफ्तार पार्टीत निलंग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,देवणीचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे,उपनिरीक्षक मुजाहीद शेख,माजी आमदार धर्माजी सोनकवडे,राम भंडारे,वलांडी बीट अमलदार शौकत सय्यद,उमाकांत नागलगावे,बालाजी सोनकवडे,पत्रकार गुरूनात हिप्पळनारे,व्येंकटराव पाटील, मकबूल भाई वलांडीकर M I M पक्षाचे देवणी तालुका अध्यक्ष फयाज शेख व गावातील सर्व पक्षातील नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.