दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
संत सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत सेना महाराज सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद रणदिवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डिकसळ नगरीचे नवनिर्वाचित सरपंच सौ पुष्पाताई नानासाहेब धाकतोडे या होत्या.
गोविंद रणदिवे, पुष्पाताई नानासाहेब धाकतोडे यांच्या हस्ते संत सेना महाराज प्रतिमापूजन करण्यात आले.
त्यानंतर पुष्पाताई नानासाहेब धाकतोडे यांची डिकसळ नगरीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोपान पवार सर यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच राज विलास सुरवसे या विद्यार्थ्यांने राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रेमचंद गोरे, विष्णू मंडाळे, युवराज पंडित, आबासाहेब मंडाळे, बाळासाहेब पौळ, राजे सावंत, जयराम राऊत, ओंकार मंडाळे , बाळासाहेब मंडाळे, महेश काळे, सुरज मंडाळे, दशरथ मंडाळे, नानासाहेब करवलकर, बप्पा सुरवसे, प्रवीण गाडे, सिद्धेश्वर डिगे, प्रसाद काळे, तसेच समाजबांधव उपस्थित होते.