दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था छ.संभाजीनगरच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथमित्र ना. वि. देशपांडे ग्रंथभेट योजनेतील पुरस्कार यावर्षी श्री शारदा वाचनालय, उस्माननगर (मोठी लाठ), ता.कंधार या वाचनालयाला देण्यात येत असून ग्रंथालय चळवळीला गती देणाऱ्या या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. शारदा वाचनालय हे मराठवाड्यातील स्वातंत्र्यपुर्वीच्या वाचनालया पैकी ह्या या वाचनालयाची स्थापना १९४२ ची आहे.परिसरातील वाचकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.ग्रंथ भेट योजनेतील ग्रंथ वितरण सोहळा रविवार, २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वाजता उस्माननगर येथे वाचनालयाच्या परिसरात होणार आहे.
सार्वजनिक ग्रंथालय चळवळ सुरु राहण्याबरोबरच गतिशील व्हावी यासाठी गत तीन वर्षांपासून एस. आर. टी तर्फे ग्रंथमित्र कै. ना. वि. देशपांडे यांच्या स्मृती जतन ठेवण्याच्या हेतूने ग्रंथ भेट योजना सुरु करण्यात आली आहे. हे पुरस्काराचे चौथे वर्ष असून रुपये पंचवीस हजाराचे ग्रंथ व संस्थेची प्रकाशने आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या आधी श्री एकनाथ संशोधन मंदिर , खडकेश्वर , छत्रपती संभाजीनगर, विजय वाचनालय, तुळजापूर, जि. धाराशिव आणि कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय, रेवगाव, जिल्हा जालना यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
रविवार, २३ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राममंदिर संस्थानं कंदकुर्तीचे अध्यक्ष सद्गुरू श्री अनंत कुमारजी (बापु) महाराज.हे असतील तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जगदीश नरहर कुलकर्णी.(संचालक ज्ञानस्त्रोतकेंद्र स्वा.रा.ति.म विद्यापीठ नांदेड.) यांची उपस्थिती असेल. रविवारी सकाळी वाचनालय परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाला वाचन प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे, डॉ. रा. शं. बालेकर, सुरेश देशपांडे, डॉ. अश्विनी वैष्णव, सारंग टाकळकर तसेच
श्री शारदा वाचनालयाचे अध्यक्ष शामसुंदर जहागीरदार, सचिव बालमुकुंद कुलकर्णी आदींनी केले आहे.