दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली-ता.18 कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरूर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आतापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर ‘ माहिती अधिकार थांबव,अन्यथा तुला थांबवेल ‘ असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वैभव देशमुख यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला आहे. देशमुख पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक तसेच मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे 31 मार्च 2023 रोजी शिरूर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची ई-मेल द्वारे तक्रार केली होती.याचाच राग मनात धरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याचे बोलले जात आहे.