दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींची पुण्यतिथी उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. पुण्यतिथी दिनानिमित्त पहाटेपासून विविध कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.असंख्य स्वामी भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाला नगरसेविका सरोज म्हशीलकर,नगरसेवक मुन्ना पानसरे,अमर करंबे,समीर लांजेकर,बंड्या जोशी,दत्ता हेंगीस्टे,श्रीम. महामूनकर, ॲड.प्राची पोतदार,अशोक पोतदार,सौरभ गोरेगावकर,अमित करंबे,प्रदिप कुलकर्णी आदि स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.