
दैनिक चालु वार्ता वाशीम तालुका प्रतिनिधी- दिनकर गडदे
भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश येथील कमेंग व्हाली येथे अमोल तानाजी गोरे व त्याचे दोन सहकारी गस्तीवर असताना बर्फात दबले. पोहण्यात पारंगत असलेले अमोल गोरे यांनी जीवाची पर्वा न करता दोन सहकारी जवानांना सुखरूप वाचवले.
भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असलेले वाशीम तालुक्यातील सोनखास येथील अमोल गोरे ३३ वर्षे हे १४ एप्रिल २०२३ कमेंग व्हाली येथे गस्तीवर असताना त्यांचे दोन सहकारी बर्फ, पाण्यात दबले. क्षणाचाही विचार न करता अमोल गोरे यांनी जीवाची बाजी लावत आपल्या दोन सहकारी जवानांना सुखरूप वाचवले. मात्र या प्रयत्नात त्याला वीरमरण आले. अरुणाचल प्रदेशमध्ये वापरी यांग बुंग नाला इस्ट कामिंग येथे ते देशसेवेत कार्यरत होते. त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव सोनखास येथे आणले जाणार असून उद्या सकाळी १० ते ११ वाजे दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे . अमोल गोरे हे सैन्यदलात नायक पदावर कार्यरत होते. ते २६ मार्च २०११ मध्ये देशसेवेत दाखल झाले होते. विशेष म्हणजे, ते याच महिन्यात २५ एप्रिल रोजी सुट्टीवर येणार होते.
मात्र, त्यांना वीरमरण आले. त्यांचे मूळ गाव सोनखास येथे उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अमोल गोरे यांच्या पश्चात ४ वर्षांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.
भारतीय सैन्य दलात प्यारा कमांडो कार्यात असलेले जिल्ह्यातील सोनखास गावाचे जवान हे भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करत असताना शहीद झाले आहेत. सीमेवर हरवलेल्या जवानाला शोधण्यासाठी तीन प्यारा कमांडोचे एक दल हेलिकॉप्टरने पाठविण्यात आले होते. प्याराशूटने खाली उतरल्या नंतर शोध मोहिमे दरम्यान त्यांचा सम्पर्क तुटला होता व दोन दिवस ते बेपत्ता होते. नंतर त्यांना शोधण्यात आले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. व त्यांच्या पायाला इजा झाल्याचे सांगण्यात आले होते.