दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा येथील नेते माजी नगरसेवक रमेश माळी यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुथवायिज सदस्य नोंदणी सुरू आहे त्या अनुषंगाने लोहा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहर भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्यासाठी लोहा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुथवायिज सदस्य नोंदणी सुरू केली असून या सदस्य नोंदणीस लोहा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा येथील नेते माजी नगरसेवक रमेश माळी यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, शहराध्यक्ष प्रभाकर पाटील पवार, गजानन पालीमकर, आदी उपस्थित होते.