
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
आज दि.२० एप्रिल रोजी लोहा शहरात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका काँग्रेसच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजाननिमित्त तमाम मुस्लिम बांधव उपवास करतात या निमित्ताने लोहा काँग्रेसच्या वतीने लोहा शहरातील शिवकल्याण नगर काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू संगेवार यांच्या सातबारा निवासस्थानी शहरातील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन आज दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे,या इफ्तारपार्टी साठी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी येणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पवार व शहराध्यक्ष सोनू संगेवार यांनी दिली . यावेळी सदरील कार्यक्रमाला लोहा शहरातील व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार व लोहा शहराध्यक्ष सोनू संगेवार यांनी केले आहे.