
दै.चालू वार्ता प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
हाळदा :- कै. रावसाहेब पाटील शिंदे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमाच्या निमित्ताने गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गोड जेवणाच्या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आले होते. त्यामध्ये आमदार, खासदार, महाराष्ट्रातील प्रशासनामध्ये काम करणारे प्रशासकीय अधिकारी मान्यवर मंडळी. माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उद्योगपती सर्व गावातील सरपंच मंडळी आले होते. या सर्व मान्यवर मंडळींनी कै. रावसाहेब पाटील शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भावपूर्ण श्रध्दांजली वाहून गोड जेवणाच्या कार्यक्रमामध्ये येऊन जेवण करून मान्यवर मंडळी गेले. यावेळी कंधार, लोहा तालुक्याचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्री. श्यामसुंदर शिंदे साहेब, युवा नेते विक्रांत दादा शिंदे, रविराज पाटील शिंदे, रोहित पाटील शिंदे, रणजित पाटील शिंदे, राजीव पाटील शिंदे, शिंदे कुटुंबातील सर्व मान्यवर मंडळी, गावकरी मंडळी, लोहा , कंधार तालुक्यातील जिवलग ,नातेवाईक, कार्यकर्ते मित्र या कार्यक्रमाला उपस्थित होते.