
दैनिक चालू वार्ता ,खंडाळी प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी:-प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी ता अहमदपूर जि .लातूर अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी मार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात सुरू असून अंतिम टप्प्यात आली आहे.जोडवाडी,सेवा तांडा,वंजारवाडी याठिकाणी 100 %लसीकरण झाले असून खंडाळी,धसवाडी ,कोपनरवाडी,नाईक नगर, खरकाडी तांडा व भोजा तांडा अंतिम टप्प्यात आहे .वैद्यकीय अधिकारी डॉ.बायस सर आणि डॉ. केंद्रे सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार, आरोग्य सहायक श्री. फड व श्री. गायकवाड, आरोग्य सेवक श्री दराडे, आरोग्य सेविका सौ ठाकूर, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडीसेविका ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील,तलाठी, शिक्षकवृंद,पत्रकार वर्ग आदी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आरोग्य केंद्र खंडाळी ता ,अहमदपूर जि ,लातूर येथील डॉ .कुंभार समूह आरोग्य अधिकारी यांचे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणारे कर्मचारी यांचे सर्व जनतेमधून अभिनंदन होत आहे .