
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
मौजे नाळेश्वर:– ता.नांदेड येथील रास्त भाव धान्य दुकानदार शिवाजी नारायण इंगोले यांना आज दिनांक 26/11/2021 दुपारी 1:30 च्या दरम्यान मारहाण करण्यात आली.त्यांना धीर देऊन दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत मा.पोलीस निरीक्षक साहेब, लिंबगाव यांना एफआयआर दाखल करून घेणे बाबत निवेदन देण्यात आले यावेळी शिवाजी इंगोले यांच्यासह नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके,शाहुराज गायकवाड, राज्य सहसचिव,अशोक गायकवाड, उपाध्यक्ष,अनिल पुरुषोत्तम कुलकर्णी,जिल्हा सरचिटणीस मो, जमिल,शहर कोषाध्यक्ष, मो. मुजाहीद आणि पदाधिकारी उपस्थित होते.