
दैनिक चालु वार्ता
नांदेड / गोविंद पवार
26नोव्हेंबर 2008साली मुंबईवर दहशदवादी हल्ला झाला या हल्लात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जख्मी झाले. भारत मातेचे विरपुर शहिद झाले.या शहिद जवानां श्रध्दांजली वाहण्यासाठी माजी सैनिक संघटनेच्या वतिने कंधार शहरात कॕन्डल रॕलीचे अयोजन करण्यात आले होते.या कॕन्डल रॕलीला शहरातील राजकीय सामाजिक संघटच्या पदधिकारी यांनी उपस्थिती लावली होती.वंदे मातरम..भारत माता की जय ..पाकीस्थान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आले.
26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो.परंतु या आंनदाच्या दिवसाला गालबोट लावण्यासाठी सन 2008साली पाकीस्थानी दहशदवाद्यानी मुंबाईवर व हल्ला केला.हा हल्ला मुंबईवरचा नसुन देशावरचा हाला होता.26नोव्हेबर ते 28नोव्हेबर पर्यंत दहशदवीदी व सैनिकांमध्ये लढा चालु होता.या हल्लात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जख्मी झाले. भारत मातेचे 18 विरपुर शहिद झाले.या हल्ल्याला 12 वर्ष पुर्ण झाले असले तरी त्या आठवणी स्मरणीय आहेत.या शहिद जवानां श्रध्दांजली वाहण्यासाठी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी कंधार शहरात कॕन्डल रॕलीचे अयोजन केले होते.ही कॕन्डल रॕली शहरातील बसस्थाका पासुन निघाली होती.वंदे मातरम..भारत माता की जय ..शहिद जवान अमर रहे’..पाकीस्थान मुर्दाबादच्या घोषणा देत हि रॕली छत्रपती शिवाजी चौकात पर्यंत निघाली. शिवाजी चौकात शहिद जवानाना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी राजकीय ,सामाजिक व्यापारी पत्रकार यासह विविध क्षेत्रातील अनेक पदधिकारी उपस्थीत होते.या कॕन्डल रॕलीत सिध्दीविनायक मिलिट्री कॕम्पचे विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
शहिद जवानाना श्रध्दांजली वाहण्यासाठी माजी सैनिक संघटनेच्या वतिने काढण्यात आलेली रॕली ही कोणत्या राजकीय पक्षाची नव्हती.एखादा जवान शहिद झाल्यास त्यांच्या अंत्यविधीला अनेक मोठे राजकीय पुढारी येऊन हजरी लावत असतत.परंतु शहिदाना श्रध्दांजली वाहण्यासाठी या राजकीय नेत्याना वेळ नसतो.कंधार शहरात ठेवण्यात आलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमाला राजकीय पक्षाचा एकाही मोठा नेता आला नाही. नाहीत.विशेष बाब म्हणजे भाजप नेहमी देशभक्तीचा पुळका दाखवत असते परंतु शहिद जवानाना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचा चा एकही पदधिकारी व कार्यकर्ता उपस्थित नसल्याने त्यांच्या विषयी उलटसुलट चर्चा होत आहे.यावेळी वंदे मातरम..भारत माता की जय ..शहिद जवान अमर रहे..पाकीस्थान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहरातील राजकीय ,सामाजिक संघटच्या पदधिकारी व पत्रकारांनी उपस्थिती लावली होती.ही कॕन्डल रॕली काढण्यासाठी माजी सैनिक संघाटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड , जिल्हा सचिव आनंद नवघरे,तालुकाध्यक्ष अर्जुन कांबळे ,तालुका उपध्यक्ष शेख अजित, कार्यध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, बापूराव कल्याणकर, संघटक राहुल कांबळे सहसंघटक नाना चिवळे , हनुमंत केंद्रे, गोविंद जायभाये ,उमाजी पंदलवाढ ,सुरेश केंद्रे, गजानन बेरे, बोंमले, आदिनी परिश्रम घेतले.