दै चालु वार्ता वृत्तसेवा /
पुणे : खा. सुप्रियाताई सुळे यांनी कोव्हीड काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल आज चालु वार्ताचे संपादक डि एस लोखंडे पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली व ताईंना भेटीदरम्यान भगवतगीता दिली.या भेटीदरम्यान पुरंदरचे आमदार संजयजी जगताप साहेब यांची पण भेट घेतली. या भेटीदरम्यान दैनिक चालु वार्ताचे संपादक डि एस लोखंडे पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली. आमदार संजयजी जगताप साहेब यांनी पण पुरंदर मतदारसंघात अतिशय चांगल्याप्रकारे कोव्हीड काळात रुग्णांना उत्तम सेवा व गोरगरिबांना मदतीचा हात दिला त्याबद्दल दैनिक चालु वार्ताचे संपादक डि एस लोखंडे पाटील यांनी खा सुप्रियाताई सुळे व आ. संजयजी जगताप साहेब यांचे कौतुक केले.