
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ तालुक्यातील जयपुर सर्कल मध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त अनेक सामाजिक संविधान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी जयपूर येथे ठीक अकरा ते तीन वाजेपर्यंत सविधान जन जागृती करून सविधान पर गीताचा कार्यक्रम आयोजित केला. चार ते सहा वाजता माहोरा येथे संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करून माहोरा गावामध्ये माझं संविधान माझा अभिमान या नावाने संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व लहान मुलांनी व मुलींनी पांढरे कपडे परिधान केली होती. असा अनोखा उपक्रम माहोरा गावामध्ये झाला. व तसेच वैद्य वडगाव येथे संविधान दिनानिमित्त माहोरा येथील लहान बालकांनी व बालकांनी संविधानाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माहोरा इथून आलेल्या सर्व बालकांना वैद्य वडगाव येथील दिलीप मगर व गौतम मगर यांनी शालेय साहित्य मजेत वही पेनाचे वाटप केले. अशाच प्रकारे संपूर्ण दिवसभर जयपुर सर्कल मध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.