
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी नवनाथ डिगोळे
दि २७ नोव्हेंबर वार शनिवार
संजिवनी महाविद्यालय
चाकूर तालुक्यातील मौजे चापोली येथील संजीवनी महाविद्यालय चापोली येथे नेहरू युवा केंद्र लातूर द्वारा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले या वक्तृत्व स्पर्धेचे आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन केले. साहेबांच्या हस्ते यावेळी गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धनंजय चाटे सर हे होते.
आपण केलेल्या चांगल्या कार्यातूनच आपल्याबरोबरच देशाचा विकास होतो. स्वामी विवेकानंदजी यांनी तरुणांना देशाचे भवितव्य मानले आहे. तरुणांच्या माध्यमातूनच देश प्रगती करू शकतो. तरुणांनी युवा मंडळ असे प्रतिपादन यावेळी केले. तसेच तरुणांनी नेहरू युवा मंडळच्या वतीने राष्ट्रहित कार्य करावे असे सांगितले.
याप्रसंगी ऍड. मंगलदास जवादे, जि.प. सदस्य माधवराव जाधव, ता.अध्यक्ष शिवाजीराव काळे, अनिलराव वाडकर, स्पर्धा आयोजक प्रशांत साबणे,सिताराम कांबळे, संगमेश्वर जणगावे, माधव तरगुडे, रामदास घुमे, नाथा मद्रेवार, अजीज शेख, गणेश स्वामी, प्रा.मुंडे संदीप सर, दत्तात्रय पवार, जनगावे आदी उपस्थित होते.