
दै चालू वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- शिवश्री कामाजी पवार, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ हे शासकीय सेवेतून ३१ आक्टोंबर २०२१ रोजी विभागीय वन अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्या निमित्ताने गौरव समितीच्या वतीने सेवापूर्ती व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मा.ना. अशोकराव चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री, म.रा.तथा पालकमंत्री, नांदेड जिल्हा) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड. पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ विशेष उपस्थिती मा. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, (लोकसभा सदस्य, नांदेड), मा. खा. हेमंत पाटील (लोकसभा सदस्य हिंगोली) मा.सौ. मंगाराणी अंबुलगेकर (अध्यक्ष, जि.प. नांदेड ) नांदेड जिल्हातील सर्व आमदार आजी व माजी मा. सौ. जयश्री पावडे (महापौर नांदेड) मा. वसंतराव चव्हाण (अध्यक्ष, नांदेड जि.म.स.बॅक ) विशेष अतिथी मा.डॉ. उद्धव भोसले ( कुलगुरू नांदेड) मा. निसार तांबोळी (पोलीस महानिरीक्षक, नांदेड) मा.डॉ. विपीन इटनकर (जिल्हाधिकारी, नांदेड) मा. डॉ. सुनील लहाने, मा. सत्यजित गुजर, मा. शिवाजी फुले तसेच मराठा सेवा संघ सर्व कक्ष व गौरवग्रंथ प्रकाशन समीती, नांदेड जिल्हा दिनांक २८ नोव्हेंबर 20२१ रोजी रविवार वेळ सकाळी १०:३० वाजता. स्थळ :- कुसुम सभागृह व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.