
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असून त्यामुळे कोरोनासारख्या आजारांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज व्यक्त केले.
नवखंडा येथील डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयात कौमी सप्ताहानिमित्त महिलांचे महत्त्व व स्वसंरक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.चव्हाण होते. कार्यक्रमास अतिरिक्त मनपा आयुक्त बी.बी.नेमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य मकदूम फारूखी, श्रीमती फिरदोस फातेमा, फराद सुलताना, तन्मय पैठणकर आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक वाचन न करता सर्वांगीण वाचन करण्याचा सल्ला दिला. चांगली नोकरी, हुद्द्यापेक्षा समाजातील चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. आजच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे, त्यासाठी सर्वांनी जनजागृती करायला हवी. लसबद्दलचे लोकांमधील गैरसमज दूर करायला हवेत. लस सुरक्षित आहे, त्यापासून बचावच होतो, असेही म्हणाले. लसीकरणात औरंगाबाद जिल्हा मागे असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी जिल्ह्यात केवळ 54 टक्के लसीकरण होते. परंतु नागरिकांना लसीकरणाची आठवण करून देण्यासाठी प्रशासनाने काही पावले उचलली. त्यास नागरिकांसह सर्व आस्थापनांचाही चांगला प्रतिसाद लाभल्याने आता जिल्ह्यातील लसीकरण 70 टक्के झाले आहे. लस घेणे समाजाच्या हिताचेच असल्याने सर्वांनी या कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य फारूकी यांनी केले. सूत्रसंचालन फिरदोस फातेमा यांनी केले. आभार फराद सुलताना यांनी मानले.