
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : – मागील दोन – तीन दिवसांपासुन लोहा तालुक्यासह ग्रामीण भागात चालु असलेला सोसाट्याचा वारा अवकाळी पाऊस यामुळे अनेक खेड्यात विज पुरवठा खंडित झाला या वादळी वाऱ्याने हरसद येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे जनावराच्या पाण्याची गैरसोय होत असुन उन्हाळ्यामुळे विहीरीमध्ये पाण्याचा मुबलक पाणीसाठा उरला असुन ते पाणी काढुन गुरा ढोरांना पाजवण्यासाठी बळीराजाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी फिल्टर पाण्याची व्यवस्था नसल्याने व विजेची टंचाई भासत असल्याने माणसांना पिण्याचा पाण्याचा पण प्रश्न गंभीर झाला आहे तर विद्यार्थ्यांनाचा ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा झाला असल्यामुळे वरील सर्व समस्यांचा विचार लक्षात घेऊन तात्काळ महावितरण कार्यालयाने वीजपुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे दक्षिण काँग्रेस महासचिव सुदर्शन शेंबाळे यांनी केली आहे. यावेळी निवेदन देताना ज्ञानेश्वर वारे सह आदींची उपस्थिती होती.
तात्काळ वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दक्षिण काॅग्रेसचे महासचिव सुदर्शन शेंबाळे यांनी दिला आहे.