दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
जाबिंदा मैदानात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या BRS पक्षाची जाहिर सभा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केले. त्यात भाऊसाहेब जाधव यांनी देखील BRS पक्षात प्रवेश केला.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तसेच भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत तसेच कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव व ईशा ताई आणि आदित्यवर्धन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब जाधव यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश झाला.
यावेळी तेलंगणा राज्याचे आमदार खासदार मंत्री महोदय तसेच महाराष्ट्राचे नेते मंडळी उपस्थित होते.