
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी वडेपुरी
मारोतीकदम
सोनखेड येथून जवळच असलेल्या जवळा या गावांमध्ये ह .भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासून दर शनिवारी भंडाऱ्याचा महाप्रसादाचाकार्यक्रम संपूर्णगावकरी मंडळी करतात आणि आजच्या महाप्रसादाचे आयोजक चेअरमन बालाजीराव पाटील पावडे हे होते परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी या भंडार्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात हा मारुती म्हणजे सर्वांच्या नवसाला पावणारा देव आहे अशी परिसरात ख्याती झाली आहे दर शनिवारी गावकरी मंडळी मोठ्या उत्साहाने भंडाऱ्याचे आयोजन करतात भंडाऱ्यात आज ह.भ. प.परमेश्वर महाराज कंधारकर यांची कीर्तन सेवा झालेली आहे या किर्तनाला पंचायत समिती सभापती आनंदराव पाटील शिंदे, सुनील भाऊ मोरे भाजपाध्यक्ष सोनखेड, डॉ. पंजाबराव देशमुख ,नरसिंग देशमुख जि.प.सदस्य प्रतिनिधि, अच्युतराव मोरे सरपंच सोनखेड वीरभद्र राजुरे सरपंच दापशेड ,संदिप देशमुख सरपंच टेळकी, गंगाधरराव मोरे,उध्दव पाटील खरबीकर,रंगनाथ महाराज,नरबा पाटील, व परिसरातून बरीच भजनी , भाविक , मंडळी उपस्थित होते त्याप्रसंगी सभापती आनंदराव पाटील शिंदे यांच्या हस्ते मारोतीरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले या आणि गावातील सर्व मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावतात अतिशय उत्सवात महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला ,शक्ती देवता मारुतीराया सर्वांना अशीच सद्बुद्धी देवो व दिवसेंदिवस अध्यात्मातून ग्राम सेवेकडे चालणारा सुंदर कार्यक्रम होत राहो अशी सदिच्छा कंधारकर महाराजांनी कीर्तनातून व्यक्त केली आहे .राजकिय, सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित मंडळीचे आभार गावकरी मंडळाच्यावतीने राजेश पाटील पावडे यांनी मानले