
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
चौकटीत
दिवाळी मध्ये भेसळ युक्त खुल्या तेलाची दिवसा ढवळ्या विक्री जोरात जनतेच्या आरोग्य ची पर्वा न करता खुले भेसळ युक्त तेल विकुन तेल माफियांची दिवाळी जोरात करतांना दिसून येत आहे.
खुल्या भेसळ युक्त तेलाची सविस्तर माहिती व होलसेल आणि किरकोळ ठिकानां सह माहीती पुढील बातमीत
हदगाव तालुक्यात भेसळयुक्त तेल माफियाने वर तोंड काढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात भेसळयुक्त खुल्या तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणत होत असून तिरुमला ट्रेडिंग कंपनी, गोकुळ तेल इतर कंपनी च्या खुल्या व भेसळयुक्त तेलाचा पूरवठा हदगाव तालुक्यातील बाजारपेठेत दिवसा ढवळ्या खले आम ट्रक ( आयचर ) मधुन होत आसताना सुध्दा या कडे अन्न व औषध प्रशासन व संबंधीत स्थानिक प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे येवढेच नाही तर खुल्या तेलामुळे अनेक रोग पसरत असल्याचे दिसून येत आहे.म्हणुनच प्रशासनानी खुलेतेल विक्री वर बंदी घातली असली तरी मात्र भेसळयुक्त तेल माफियाने सीलबंद भेसळयुक्त तेल पाकीट हि बनवण्याची शक्कल लढऊन हदगाव तालुक्यातील किराणा दुकानात व किरकोळ दुकानदारा पर्यंत भेसळयुक्त खाद्य तेल खुले तेल पुरवले जात आहे. तर हदगाव तालुक्यातील तामसा,नीवघा हिमायतनगर व अन्य ठिकाणी तिरुमला ट्रेडिंग कम्पनी, गोकुळ तेल व इतर वेगवेगळ्या नावाच्या खाद्य खुले तेल ट्रक ( आयचर ) मधुन पुरवठा करत असल्याचे दिसून येते येवढेच नाही तर नविन बसट्यांड समोर, जुने बसट्यांड, आठवडी बाजार व पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर दत्त किराणा या ठिकाणी तसेच आझाद चौक, व इतरत्र हदगाव शहरात खुल्या तेलाच्या टाक्या उतरून सर्वत्र ग्रामीण भागत हे दुकानदार पोहचती करत असल्याचे दिसून येते हे खाद्य तेल खराब असून घाण वास येते व त्या मध्ये काळा गाळ येतो जनावरांच्या चरबी सारखे घट्ट होते तेल गरम झाले की त्यावर फेस येतो त्यामुळे सिद्ध होते कि हे तेल भेसळ युक्त असून जनतेच्या आरोग्यास हानिकारक आहे या भेसळ्युक्त तेला मुळे वयोवृद्ध माणसासह शाळकरी विध्यार्थीना अनेक मोठ्या रोगाची लागान होत आहे तरी देखील अंन्न व भेसळ स्थानिक प्रशासन या कड़े दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाचा सुद्दा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे यावरून दिसून येते तर जिल्यातील सुकाणू समित्यां सुद्दा या बाबत अजूनही अनभिज्ञ असून सुकाणू समित्यां जिल्यात आहेत की नाही हा सुद्दा प्रश्न जनतेला पडला असून जनतेच्या जीवशी व आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या भेसळ्युक्त तेल माफियांला कोन रोखानार असा प्रश्न ययेथील सुजाण नागरिक विचारताना दिसत आहेत खुले आम दिवसा ढवळ्या भेसळ्युक्त तेलाची हदगाव शहरात विक्री होत असून या भेसळ्युक्त तेल माफियांना पाठबळ कुणाचे हा विचार सुद्दा जनता करु लागली असून अन्न व औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतो का?हदगाव तालुक्यात भेसळयुक्त तेलाचा खेळ ह्या प्रकारचे तर्क सुद्दा जनता काढू लागली आहे असे आसले तरी मात्र हदगाव तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य भेसळ्युक्त तेलामुळे धोक्यात आले असून जनतेच्या आरोग्याशी हे तेल माफियां खेळ करत असून भेसळ युक्त तेलाचे नमुने अन्न व औषध प्रशासन घेत नसल्यामुळे त्यांच्या कडे शंकेच्या नजरेने पहिले जात असून या तेल माफियांना कसे रोकनार या कडे हदगाव शहरातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत… हदगाव शहरातून भेसळ्युक्त खुल्या तेलाची वाहतूक करत असताना सुद्दा पोलिस प्रशासन मात्र यां कड़े जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते हदगाव तालुक्यात खाद्य तेल पुरवठा करत असलेले प्रत्येक ट्रक ( आयचर ) ची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून जोर धरत असून याला अंन्न व भेसळ प्रशासनाने आळा घालावा अशी ही मागणी जनतेतून होत आहे.