
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- पालघर जिल्ह्यातील डहाणू -नाशिक रेल्वेमार्गाची अनेक वर्षापासूनची मागणी होती.मात्र सर्वेक्षणात हा रेल्वेमार्ग किफायतशीर ठरणार नाही असा अहवाल आल्यानंतर हा विषय बाजूला पडला.तेव्हापासून या रेल्वे मार्गाबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे.त्यानंतर ठाणे-जव्हार नाशिक या रेल्वेमार्गासाठी अनेक व्यक्तींकडुन प्रयत्न सुरू आहेत. युवक ही रेल्वेमार्गासाठी अग्रेसर झाले असून जव्हार पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष पारस सहाणे यांनी भारत सरकारचे केंद्रीय पंचायती मंत्री कपिल पाटील यांना ठाणे-जव्हार-नाशिक या रेल्वेमार्गासाठी निवेदन देण्यात आले.त्यामुळे जव्हार भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्षांत पर्दापण होत असतांना मागील ७५ वर्षात प्रगती दिसत असली तरी ग्रामीण भागातील गोरगरीब आदीवासी जनतेला खऱ्या अर्थाने अजुनही स्वातंत्र्याचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही हे वास्वतही विसरता येणार नाही.पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे देशाच्या १०० वा स्वातंत्र्य दिन साजरा होईल तेव्हा देश पायाभूत सुविधा व विकासाची गंगा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे असा संकल्प करुन देशभरात “आजादी का अमृत महोत्सव” हा उपक्रम साजरा करण्याचे आव्हान केले आहे.अमृत महोत्सवी वर्षांत पर्दापण ही घटना आनंददायी असली तरी हा आनंदोत्सव साजरा करतांना या अमृत महोत्सवी वर्षात रेल्वे अर्थ संकल्पात निधीची तरतुद करुन ठाणे-भिवंडी-वाडा – जव्हार-मोखाडा-नाशिक असा रेल्वेमार्ग निर्माण करुन ठाणे पालघर जिल्हातिल औद्यौगिक आदीवासी भाग एकमेकांना रेल्वेमार्गाने जोडले तरच खऱ्या अर्थाने आदीवासी भागाचा विकास होउन पर्यटन,कारखाने या क्षेत्रात संधी निर्माण होऊन रोजगाराचा प्रश्न मिटेल.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे ठाणे पालघर जिल्हातिल पहिलेच केंद्रीय मंत्री आहेत,त्यामुळे त्यांच्याकडून ठाणे-जव्हार-नाशिक रेल्वे मार्गासाठी अपेक्षा वाढल्या आहेत.पाटील जव्हार भागातील समस्यांची जान आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे हा प्रश्न लावुन धरुन आदीवासी भागाचा मार्ग खुला करतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपील पाटील यांनी ही यावेळी सांगितले की,या रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकार सकारात्मक विचार करत असून, निश्चितपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली जाईल.जव्हार येथुन रेल्वे मार्ग जावा यासाठी जव्हारचे राजे व माजी खासदार यशवंतराव मुकणे,जव्हारचे माजी नगराध्यक्ष राजाराम मुकणे,भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा,दिवंगत पत्रकार दयानंद मुकणे यांनी अपार कष्ट घेतले मात्र त्यांचे प्रयत्न अजून पुढे नेण्याचे काम करत राहीन असे पारस सहाणे यांनी सांगितले.