
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
लोहा:- राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा,माणुसकी जपणारा, जनसामान्याचा राजा, सर्वसामान्यांचा आधार, गोरगरिबांचा वाली, *आदरणीय प्रा.डॉ.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब* यांनी कोरोना काळामध्ये *भाऊचा डबा* हा उल्लेखनीय उपक्रम सुरु केला त्याला आज 211 दिवस पूर्ण झाल्याबद्दल *लोह्यातील कर्तव्य कॉमर्स क्लासेस व 7 मार्स फाउंडेशन* च्या वतीने भाऊचा शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला या *कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संत गाडगे महाराज वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ.अशोकरावजी गवते साहेब* हे होते .आदरणीय पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब यांनी कोरोना काळामध्ये भाऊचा डबा हा उपक्रम राबवला त्याची मदत समाजाला भरपूर मोठ्या प्रमाणावर झाली तसेच ST कामगारांना सुद्धा भाऊ चा डब्बा या माध्यमातून अन्नपुरवठाचे काम भाऊनी केले त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन या कार्यक्रमामध्ये भाऊंनी आपले विचार मांडत असताना *कोणी तहसीलदार व्हा, कोणी बँक मॅनेजर व्हा, कोणी कलेक्टर व्हा पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही चांगला माणूस व्हा* हा विचार सर्वांसमोर मांडला तसेच *आपले आई-वडील हेच आपले खरे दैवत* असे देखील भाऊंनी आपल्या मार्गदर्शनातून कळविले *जो व्यक्ती संकट पचवू शकत नाही तो व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही* असेही भाऊने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
आदरणीय गवते सरांनी पुरुषोत्तम भाऊ धोंडगे हे कोणत्या एका गोष्टी मध्ये नसून सर्व गोष्टीमध्ये अष्टपैलू आहेत *क्रिकेटक्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, किंवा राजकीय क्षेत्र असेल* यासर्वामध्ये अष्टपैलू असणार व्यक्तिमत्व म्हणजे *आदरणीय भाऊ होय* असे सरांनी आपल्या मार्गदर्शनातून कळविले कर्तव्य कॉमर्स क्लासेस चे संचालक तथा 7 मार्स फाउंडेशन चे सचिव संतोष पाटील गायकवाड यांनी *माणसे बरेच असतात पण काही माणसे हे मनात घर करतात त्यांना देव माणसे असे म्हणतात* असे विचार आदरणीय पुरुषोत्तम भाऊ साठी मांडले.
या कार्यक्रमासाठी नांदेड पोलीस आमचे बंधू संजय पाटील जाधव, लोहा नगरपालिकेचे नगरसेवक भास्कर पाटील पवार तसेच प्रा. हरिभाऊ शिंदे व प्रा.प्रदीप गरुडकर सर (पत्रकार) शुभम सावकार उत्तरवार हे होते
*कर्तव्य कॉमर्स क्लासेस ची सर्व टीम संचालक प्रा. संतोष पा. गायकवाड सर, प्रा.संजय फाजगे सर, प्रा.सतीश बगाडे सर, प्रा शिवलिंग नागसाखरे सर सर्व उपस्थित होते*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील जाधव, प्रस्ताविक संतोष गायकवाड तर आभार फाजगे सरांनी मांडले.