
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे
मंठा एप्रिल महिना सरताच उन्हाच्या झळा सुरु झाल्या असून अनेकांनी उन्हाळ्यासाठीची तयारी देखील सुरु केली असेल. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर, पंखे आणि एअर कंडिशनर रिपेअर करून घेतात किंवा नवीन एसी किंवा कुलर खरेदी करतात. जीव नकोसा करणाऱ्या या उन्हाळ्यात प्रत्येकाला एसी आणि कुलरचा गारवा हवा हवासा वाटतो. पण, प्रत्येकालाच नवीन कूलर किंवा एसी खरेदी करणे शक्य होतेच असे नाही. अशात, तुम्ही तुमच्या घरी असलेला जुना कूलर फेकून न देता स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात येत आहेत. परंतु सावधान, कारण कुलरच्या वापरासोबतच कुलरची सुरक्षित हाताळणी करून अपघात टाळण्याची गरजेचे आहे.
प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हिताचे ठरणारे आहे. उन्हाळयात शॉक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री – पीनचा वापर थ्री-पीन प्लगवरच करावा व अर्थिंग नीट असल्याची खात्री करावी. घरात अर्थिंग लिकेज सर्किट ब्रेकर, एम. सी. बी. बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका संभवताच ताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अर्थिंग व्यवस्थित असेल तर बराच धोका कमी
होतो तसेच विजेचा वापर योग्यप्रकारे होतो. कुलरच्या लोखंडी बाहय भागात वीज पुरवठा येऊ नये, यासाठी कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी. पाणी भरतांना कुलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा. कुलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करून त्यानंतर प्लग काढल्यानंतर पंपाला हात लावावा पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.