दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी- विजयकुमार चिंतावार
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस चा गड कायम राखला.
येथे होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते अखेर काँग्रेस चा बालेकिल्ला काबीज करण्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना यश आले आहे. भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेस १३ व राष्ट्रवादी काँग्रेस चे ०२ असे एकूण १५ उमेदवार विजयी झाल्याने एक हाती सत्ता कायम ठेवण्यात यश प्राप्त झाले असून. भारतीय जनता पक्षाचे ०३ उमेदवार विजयी झाले आहेत. नव्यानेच तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या व नव्यानेच निवडणुकीत उतरलेल्या बी. आर. एस. पक्षाला खातेही उघडता आले नाही.
विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे माजी सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी उपसभापती गणेश राठोड,माजी संचालक रामचंद्र मुसळे,माजी संचालक पंकज पोकलवार यांनी आपली विजयी परंपरा कायम राखली आहे.सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून उज्वल केसराळे,जाधव व्यंकट सोनबा,केशव पाटील सोळंके पोमनाळकर यांनी तर राष्ट्रवादी कडून विश्वंभर पवार तर भारतीय जनता पार्टी कडून सुभाष पाटील किन्हाळकर हे विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती शिवाजी कदम तर काँग्रेसच्या वर्षा आनंदराव देशमुख ह्या विजयी झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे बालाजी गंगाधर शानमवाड हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून काँग्रेसचे जगदीश पाटील कल्याणकर.ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल मतदारसंघातून राजकुमार लक्ष्मण अंगरवार हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून किशन सखाराम वागतकर हे विजयी झाले आहेत. हमाल व मापाडी सय्यद खाल्लेद सय्यद रफिक हे विजयी ठरले तर आडते व व्यापारी मतदारसंघातून पंकज सखाहरी पोकलवार व सारंग अशोककुमार मुंदडा यांनी विजय संपादन केला आहे.
विजयी उमेदवारांचे ढोल ताशाच्या गजरात शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, जिल्हाउपाध्यक्ष भगवानराव दंडवे,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.