
दैनिक चालू वार्ता
हदगांव प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
शिवसेनेची शाखा असलेल्या युवासेना या स्वतंत्र संघटनेची बांधणी व विस्तार करण्याच्या ऊद्देशाने हदगाव येथील राष्ट्रीय क्लब मैदानावर दिनांक २९ नोव्हेंबर रोजी, सोमवारी युवासेना शिबिराचे आयोजन जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर यांनी केले आहे. या मेळाव्याला दिग्गज मार्गदर्शक व पदाधिकारी यांच्यासह युवासेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यभर शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत हदगाव येथे मंगळवारी हा मेळावा संपन्न होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सोबतच शिवसेना सत्तेत आल्यापासून कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि राज्यात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लॉक डाउन होत राहिले. राज्याचा बराचसा निधी आरोग्य सेवेसाठी खर्ची पडला. त्यामुळे अनेक विकास कामांना बगल देत राज्याचा गाडा इतर दोन पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री यशस्वीपणे हाकत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि युवासेना ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शानुसार चालणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेची बांधणी व उजळणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळाला नाही. त्यामुळे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी निर्णय घेऊन आपल्या सर्व शिलेदारांना कामाला लावले. मागील दोन-तीन वर्षात नव्याने झालेल्या मतदारांना शिवसेनेच्या प्रवाहात आणणे आणि राज्य व देशासाठी काम करणारी पिढी तयार करणे, हा या मागील उदात्त हेतू आहे. हदगांव येथे होणाऱ्या या मेळाव्याला युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, हे प्रमुख मार्गदर्शक लाभणार आहेत. तसेच नांदेड जिल्हा विस्तारक अमित गीते आणि जिल्हा युवा अधिकारी माधव पावडे, महेश खेडकर, आणि बालाजी शिंदे हे सर्वजण जिल्हा युवा अधिकारी कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. या सोमवारी होणाऱ्या या मेळाव्यासाठी खासदार हेमंत पाटील, नांदेड ऊत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, उपजिल्हाप्रमुख रमेश घंटलवार, माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय पवार, तालुकाप्रमुख शामराव चव्हाण, युवासेनेचे तालुका अधिकारी निलेश पवार, शहराध्यक्ष अमोल आडे, हिमायतनगर तालुका अधिकारी विशाल राठोड, शहराध्यक्ष अमोल धुमाळ इत्यादी शिवसेना आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.