
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
वैजापुर तालुक्यातील औरंगाबाद मालेगाव महामार्गावर शिऊर बंगला ते तलवाडा हा रस्ता अतिशय खड्डेमय झाला असून हा रस्ता तात्काळ आठ दिवसात दुरुस्त करावा, अशी मागणी वैजापूर पंचायत समिती उपसभापती योगिताताई आनंद निकम यांनी निवेदनात केली होती
सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीच दखल न घेतल्याने उपसभापती योगिताताई निकम यांनी आज दि.२७ रोजी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होत असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे रुग्णवाहिकेला १० कि.मी. अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास लागत आहे अनेक रुग्ण प्रवासातच दगावत आहेत. त्यासाठी बांधकाम विभागाने त्वरीत रस्त्याचे काम सुरू करावे, जोपर्यंत काम सुरु होत नाही तोपर्यंत हा लढा सुरु ठेवणार असल्याचे योगिता निकम यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दत्तु पाटील वाकलेकर, बाळासाहेब भोसले, लोणीचे सरपंच अप्पासाहेब जाधव अजय पाटील,किशोर मगर, ज्ञानेश्वर मगर, शिवूरचे बाळा पाटील, सागर जाधव, ज्ञानेश्वर मावली भटाणकर, अनिल भोसले, व अनेकांनी या उपोषणात सहभाग नोंदवला मोठ्या संख्येने उपोषणास पाठिंबा मिळतांना दिसून आला यावेळी शिवूर पो.स्टे. अविनाश भास्कर यांनी बंदोबस्त ठेवला.