
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी:
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची सहविचार सभा व परभणी महानगर जिल्हा कार्यकारीणी निवडीची बैठक दि. २ मे रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात आली. यावेळी महानगराध्यक्षपदी दत्तात्रय कराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
परभणी येथील पिंगळी रोडवरील कोकनट रिर्सोल्ट येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाची सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश नाईकवाडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रविण देशपांडे, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर,कार्याध्यक्ष प्रभू दिपके,प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत सर्वानूमते परभणी महानगराध्यक्ष म्हणून दत्तात्रय वामनराव कऱ्हाळे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून शिवशंकर सोनूने, सरचिटणीसपदी पांडूरंग अंभुरे, सचिवपदी संघपाल आढागळे, सहसचिव म्हणून प्रमोद अंभोरे यांची निवड करण्यात आली. तसेच डिजीटल मिडिया शहर जिल्हाध्यक्ष म्हणून अकबर सिद्दीकी तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून किरण घुंबरे यांचीही निवड करण्यात आली.
यावेळी सोनपेठ येथील तालुका पत्रकार संघाने डॉ. तातेराव लहाने यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांची नेत्र तपासणी करत सामाजीक बांधिलकी जोपासली आहे. या कार्यासाठी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शिवमल्हार वाघे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच पंजाब राज्यातील चंदीगढ येथे गतका खेळामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल पत्रकार पांडूरंग अंभुरे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रसिध्दी प्रमुख म्हणून कार्यरत असणारे सुधाकर श्रीखंडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियास, शेख मोहसीन, एम.ए.माजीद यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेलू येथील ज्येष्ठ पत्रकार कांचन कोरडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य विठ्ठलराव वडकुते, नरहरी चौधरी, ॲड. सुमन उफाडे, धनंजय आडसकर, मंदार कुलकर्णी, प्रेस फोटोग्राफर संजय घनसावंत, योगेश गोतम, सुनिल सुतारे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडितराव मोहिते, अॅड. विशाल कऱ्हाळे, अजहर शेख, अमित काळे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर श्रीखंडे तर आभार प्रमोद अंभोरे यांनी मानले.दरम्यान या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.
दत्तात्रय कराळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या परभणी महानगर अध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित झाल्यानंतर त्यांना पुष्पमाला अर्पण करताना जिल्हा पत्रकार महासंघाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा पुढारी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण देशपांडे….
परभणी महानगर अध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित झाल्यानंतर दत्तात्रय कराळे यांना माल्यार्पण करुन आशीर्वादाची थाप देताना मराठवाडा निवडणूक निरीक्षक तथा प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, सोबत संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, कार्याध्यक्ष प्रभू दिपके, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मानोलीकर, माजी अध्यक्ष तथा दै.पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण देशपांडे दिसत आहेत.
दत्तात्रय कराळे यांची बिनविरोध निवड घोषित झाली तेव्हा त्यांना परभणीचे उद्योगपती तथा हितचिंतक पंडितराव मोहिते-पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले त्यावेळी जिल्हा संघाचे पदाधिकारी व विकासक कमीत काळे दिसत आहेत.