
दैनिक चालू वार्ता
परमेश्वर वाव्हळ पिंपरी शहर प्रतिनिधी,
पुणे-रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड (पीएमपीएमएल) मागासवर्गीय संघटनेच्या वतीने निगडी आगारात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त निगडी आगारात एका कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी आगारात भारतीय संविधान उद्देशिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून, आगारात सर्वत्र पेढे वाटप करण्यात आले. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे रवी भाऊ लांडगे, राजाभाऊ टकले, हेमंत जोशी, गॅरेजचे सुपरवायझर मल्हार पाटील, रसाळ अण्णा, टाईम किपर सुनील महाराज मोरे, आप्पा पंढरकर, बापू ढुबे, दत्तात्रय दर्शिले,आश्रुबा सिरसट, संजय भालेराव, किशोर केवडे निखील कुंभार याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन देवकर, राहुल जोगदंड, राहूल बनसोडे,अनंत सावंत, गोटु ठाकरे, श्रीकांत तलवारे, दीपक लगाडे, शिवाजी मारशिवणे,भगवान कांबळे, संतोष भरती, नितीन धाकड यांच्यासह अनेक कामगार या कार्यक्रमास उपस्थित होते.