दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय , मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ” मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाला आहे .
कार्यक्रमात वीरभद्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषअप्पा शिवपुजे ,सचिव रणजित पाटील हंगरगेकर , कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती , जेष्ठ सदस्य शिवराज पाटील हंगरगेकर , माजी प्राचार्य ज्ञानोबा वंजे , उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर कदम ,
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर तहाडे , डॉ. विठ्ठल शेटवाड , डॉ. नामदेव नरवाडे , डॉ. किरण ठाकरे , डॉ. संदीप ढगे , डॉ. मीरा ढगे , डॉ. प्रतिक्षा दहेकर , प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , जेष्ठ प्रा.सी.बी.साखरे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , हिंद लँब व्यवस्थापक अनिल पल्लेवाड , वैद्यकीय तांत्रिक साहाय्य पुल्ले , बेग , शेख , मांजरमकर , चंद्रमुनी , बनसोडे , दिव्या आँप्टिकलचे दिलीप पांचाळ इत्यादींची उपस्थिती लाभली होती .
दि. 01 मे रोजी महाराष्ट्र दिन व महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचा लाभ वीरभद्र शिक्षण संस्थेचे पदाधिकारी , संचालक मंडळ , प्राचार्य , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक , विद्यार्थी व विद्यार्थिनी इत्यादींनी बहुसंख्येने उत्सफुर्त सहभाग घेऊन आरोग्य व रक्त तपासणी शिबीरात प्रत्यक्ष सहभागी झाले होते .
महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक , सामाजिक व आरोग्याविषयीच्या उपक्रमात हा एक महत्त्वाचा घटक मानला जात आहे . विद्यार्थी , पालक निरोगी राहण्यासाठी सर्वजण धडपडत असतात . परंतु या बरोबरच महाविद्यालयीन परिवार देखील निरोगी असल्याची खात्री आरोग्याच्या दृष्टीने खुपच हितावह आहे . या करिताच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सी.बी.सी. , कोलेस्टेरॉल , थायरॉईड , कँन्सर , शुगर , ह्रदयरोग , बी.पी., हायपर टेन्शन इत्यादी आजाराचे अचूक निदान करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व तज्ञ सल्लागार हे उपस्थित झाले होते . समाजाला घडवणारा घटक हा स्वस्थ असला पाहिजे . तो सशक्त समाज घडवू शकतो . ही या कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका होती . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. सी.एन.एकलारे , प्रा.डॉ. बी.एस.केंद्रे , स्वयंसेवक दिनेश काकडे , महेश वडजे , गणेश येडते , शैलेश धन्नकवार , व्यंकटेश कन्नडे , स्वयंसेविका कु.रेणुका तुरटवाड , कु.श्रद्धा गेडेवाड , जान्हवी सुवर्णकार इत्यादींनी प्रयत्न केले .