
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
काॅंग्रेसचे उमेदवार गाैरव वाणी यांनी आज भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांच्या विराेधातील अर्ज मागे घेतल्याने पुन्हा एकदा धुळे- नंदुरबार विधान परिषद मतदारसंघात पटेल यांचा विजय झाला आहे.विजया नंतर अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सर्व मतदारांचे आणि भाजप नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले हा विजय सर्व मतदारांच्या एकजूटीमुळे झाला आहे. ते सर्व माझ्या साेबत राहिले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे. खरंतर मला लढायचं हाेतं परंतु आता ती इच्छा अपुर्ण राहिली आहे.अमरीशभाई म्हणाले दाेन्ही जिल्ह्याचा विकास कसा हाेईल याकडे लक्ष राहील. पालिका, जिल्हा परिषदेत ज्या अडचणी येतात ते साेडविल्या जातील. खास करुन शिरपूरचा विकास कसा हाेईल यासाठी प्रयत्नशिल राहीन. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितीच प्रयत्न राहतील असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
दिल्लीत दाेन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी उमेदावारी मागे घेण्याबाबत निश्चित केले. त्यामुळे विराेधकांनी अर्ज मागे घेतले. काेल्हापूरात काॅंग्रेसचे सतेज पाटील हे बिनविराेध झाले. येथे भाजप पक्ष बिनविराेध झाला आहे असेही पटेल यांनी नमूद केले.