दैनिक चालु वार्ता अबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
: काल दि 6 रोजी जालना ते देऊळगाव रोडवर कन्हैया नगर चौक रिलायन्स पेट्रोल पंप समोर संध्याकाळी साडे नऊ च्या दरम्यात आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी नंबर MH21 BH 6357 वरील नियंत्रण सुटल्याने आयशर गाडी रोडच्या खाली जाऊन खड्यात आदळली या अपघात मध्ये
कुठलीही जीवित हानी झाली नाही आयशर चालक नरेश नारायण रंधवे वय 25 रा कन्हैया नगर जालना व क्लिनर गौतम खंडागळे वय 40 रा कन्हैया नगर जालना हे दोघे किरकोळ जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थेचे ॲम्बुलन्स चालक राजेंद्र राठोड हे ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले व पेशंटला सरकारी दवाखाना घाटी येथे
उपचारासाठी दाखल करण्यात आले