दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर महिन्याच्या,तिसऱ्या मंगळवारी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येत आहे.त्या अंतर्गत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या १६ मे २०२३ रोजी होणार आहे.स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या,कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
जिल्हयातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी “जागेवरच निवड” (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे.त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील.मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.
*५७ रिक्तपदांसाठी राबविणर भरती प्रक्रिया*
या मेळाव्यामध्ये ५७ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.यामध्ये अमरावती कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर ॲन्ड कंन्सल्टंट प्रा.लि.यामध्ये २० पदांसाठी तर सर्व्हेयर या १५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.तसेच अमरावती ए.ए.ए. ॲण्ड असोसियटस या उद्योगात ऑडिट असिस्टंट,जी.एस.टी.असिस्टंट,कॉम्युटर ऑपरेटर अशा एकूण १२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.तसेच ॲक्झॉन मल्टीस्पेशालिटी,सुपरस्पेशालिटी आणि क्रिटीकल केअर हॉस्पीटल,अमरावती येथील अटेडंन्ट,वार्डबॉय,आर.एम.ओ.,नर्स,ब्रदर अशा एकूण १० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.अशा एकूण ५७ पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/sU57s93TGeeinj9P9 या लिंकवर जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.अथवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.
यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे.Job Seeker (Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. JOB SEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक,आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGIN व्हावे.त्यानंतर Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. Amravati जिल्हा निवडून Filter द्यावे.त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्हयातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते.त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह,पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -२,दिनांक- १६/ ५/२०२३ मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List या टॅबवर क्लिक करावे. ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील.त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे.शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.
याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,दुरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.तसेच १६ मे २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर,उस्मानिया मस्जिदजवळ,बस स्टैंड रोड,अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा,पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे,असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल एस.शेळके यांनी केले आहे.