दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने बाजारपेठेत व बस स्थानकावर मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये मोबाईल सोन्याची दागिने, पैसे चोरीला जाऊ नये म्हणून पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे. तरीसुद्धा नागरिकांची सतर्क असणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी खरेदीला व आपले घर सोडून बाहेर गावी जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी केले.
पोलीस ठाण्याकडून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे फेसबुक व्हाट्सअपद्वारे सावधानतेच्या सूचना देण्यात येत आहे. खरेदीला बाजारातजाताना मोबाईल शर्टच्या खिशामध्ये ठेवू नये. जर आपण आपले घर सोडून बाहेर गावी जात असाल तर शेजारच्याला किंवा इतर नातेवाईकांना सांगून जावे. महिलांनी सोन्याचे दागिने घालून खरेदीसाठी जाऊ नये. दुचाकी चार चाकी वाहन सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावी सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या ठिकाणी वाहन पार्किंग करावे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घर मालकघर बंद करून बाहेरगावी नातेवाईकाकडे जातात. त्या काळात बंद घरे फोडून चोऱ्या होतात. या चोऱ्या टाळण्यासाठी घरामध्ये दागिने पैसे ठेवू नयेत बाहेरगावी जात असताना शेजारी राहत असलेल्या व्यक्तीला नातेवाईकाला घरावर लक्ष ठेवण्यासाठी सांगावे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनला अर्ज देणे महत्त्वपूर्ण ठरेल अशा सूचना पोलिसांना देण्यात आले आहेत.