दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर;भंडारा जिल्ह्यातील *पहेला* येथील रहवासी पत्रकार समाजसेवक ,विविध सामाजिक संघटनेशी निगडित असलेले ,आंदोलनकारी व फुले ,शाहू ,आंबेडकर, अण्णाभाऊ साठे चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार समाजसेवक *संजीव मुरारी भांबोरे* यांनी १० मे 2023 रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री *के.चंद्रशेखर राव* यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रगती हाऊस हैदराबाद येथे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून भारत राष्ट्र पक्षात प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर समन्वय पूर्व विदर्भ व भारत राष्ट्र समितीचे नेते यांचे आदेशाने प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत संजय मून वर्धा, संजय बुल्ले नागपूर ,यांनी सुद्धा प्रवेश केला .यावेळी त्यांच्यासोबत रविकांत खोब्रागडे समन्वयक नागपूर , मुरलीधर भर्रे समन्वयक भंडारा जिल्हा , मनीष नांदे समन्वयक वर्धा जिल्हा ,एडवोकेट रमेश कुमार सिन्हा नागपूर ,त्यांच्यासोबत उपस्थित होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के .चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात किसान सरकार म्हणत आणायचे ठरविले असून त्यांच्या पक्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रगती हाऊस हैदराबाद मध्ये प्रवेश केला.