
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :मी मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार देणार आहे. यासंबंधी माझ्याकडे पुरावे आहेत. आरटीआयमधून मी माहिती मागणार आहे. खोट्या तक्रारी करून कट कारस्थान रचलं जातंय.राज्यात एक अनिल देशमुख झाले. बाकीच्यांना तुम्ही तेच करणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाहीहे सगळं माझ्या विरोधात खोट्या घटनांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्र्यांना खोट्या आणि फर्जी प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे.
माझ्या विरोधात केंद्रीय यंत्रेणेचे अधिकारी व्हॅट्सॅपवर माझ्या विरोधात मेसेजेच पसरवत आहेत. माझ्या विरोधात लोकांना मेल पाठवून केंद्रीय यंत्रणा मंत्र्याला पाडण्याचा डाव रचत आहेत.मी अमित शाहांना तक्रार करणार आहे. तुमच्या हाताखालचे अधिकारी असं काम करत असतील तर त्याचं उत्तर मिळालं पाहिजे असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला
केंद्रीय यंत्रणेचा वापर करून मविआ सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इडी सीबीय यामार्फत तेच चालू आहे. केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. आणि मी ते कोर्टात सादर करणार आहे.
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात हायकोर्टानं दिलेला निकाल रद्द करा, अशी मागणी करत नवाब मलिकांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं अर्ज दाखल केला . या अर्जात त्यांनी ज्ञानदेव वानखेडेंनी आपल्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यावर पुन्हा नव्यानं सुनावणी घेण्याची मागणीही केली आहे. तसेच या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत वानखेडेंबाबत कुठलंही विधान करणार नाही, अशी यापूर्वीच दिलेली हमी कायम ठेवण्यास तयार असल्याचंही नवाब मलिकांनी मान्य केलं आहे.
मात्र मुळात तुमच्या विरोधात कोणतेही ठोस निर्देश नसताना तुम्ही ही मागणी का करताय अशी विचारणा न्यायमूर्ती एस. काथावाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नवाब मलिकांच्या वकिलांना केली. त्यावर न्यायमूर्ती माधव जामदारांच्या निकालात वानखेडेंना दिलासा दिलेला नसला तरी नवाब मलिकांवर ओढलेल्या ताशेऱ्यांवर मलिकांचा आक्षेप आहे, असं त्यांच्यावतीनं कोर्टाला सांगण्यात आलं. सोमवारी ज्ञानदेव वानखेडे यांना या अर्जावर आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.