
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-प्रेम सावंत
परभणी: शहरामध्ये परभणी लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व मार्केट कमिटी मध्ये निवडून आलेल्या धनगर समाजातील संचालकांचा समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी परभणी येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खंडोबा बाजार परिसरातील खंडोबा मंदिरात दुपारी बारा वाजता हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
परभणी लोकसभा क्षेत्रातील पालम, गंगाखेड, बोरी, जिंतूर, सेलू ,घनसावंगी, परतुर, पूर्णा, परभणी आदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते संचालक म्हणून निवडून आले आहेत. या नवनियुक्त संचालकांचा धनगर समाजाच्या वतीने परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मार्फत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यशस्वी माणसाचा सत्कार होतच असतो. पण समाजातून होणार्या सत्कारातच आईच प्रेम लपलेलं असत अशी भावना सत्कार सोहळ्याचे आयोजक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बुधवारी परभणी येथे मार्केट कमिटी संचालकाच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी दैनिक चालु वार्ता शी बोलताना व्यक्त केली.
परभणी लोकसभा क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती वर निवडून आलेल्या जिल्ह्यातील 15 संचालकापैकी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ संचालक माणिकराव आळसे गंगाखेड, गणेश कानडे बोरी, वराड जिंतूर, सुरेश भुमरे परभणी,आनंदराव बनसोडे पूर्णा आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विक्रमबाबा इमडे हे उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून बाबन मुळे, बालाजी नेमाने, पालमचे माजी उपसभापती गणेश घोरपडे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविकांत हरकळ, पप्पू ढोले जयदेव मीसे , राजकुमार दंडवते, रमेश होलपते ,बजरंग कुंभारकर, कृष्णा गोरे, रोहिदास आव्हाड ,दत्ता शेळके, अशोक जुमडे ,भाऊसाहेब आळसे, परमेश्वर गिणगीने, निवृत्ती बोबडे, विष्णू हिंगे , अशोक जुमडे, सदाशिव तायडे, मदन दुगाने,मुंजाजी खुणे आदींनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोब्राजी वाळवंटे यांनी केले.