
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
दि 10 एप्रिल (आव्हाळवाडी) पुणे.
आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते आपण दिले पाहिजे या उदात्त भावनेतून नव्या सांगवीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून माहेर या संस्थेत आंब्याच्या 15 पेट्या तीन पोती धान्य एक पोते साखर तसेच रोख रक्कम 51 हजार रुपये सह जिवनावशक वस्तू देण्यात आले .यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माहेरच्या संस्थापिका लुसी कुरियन (राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या) म्हणाल्या की ,”आमची संस्था 1997 ला वडू येथे प्रथम स्थापन केली. पहिल्या शाखेनंतर आतापर्यंत एकूण देशांर्तगत 68 शाखा झाल्या आहेत तर महाराष्ट्रात आठ अनाथाश्रम, वृद्धाश्रम, विकलांग, व मुले मुली व जेष्ट नागरिक सह एकूण देशात 2000 जण गुण्यागोविंदाने राहत आहेत. एकटया वडूला 200 मुले -मुली राहत आहेत तर आव्हाळवाडी येथे 175 विकलांग महिला राहतात . 75 मुली आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रदेशात शिक्षण घेऊन परत आल्या आहेत, सध्या पाच मुली परदेशात शिक्षण घेत असून जर्मनीमध्ये विनायक गाडे, अक्षय कणसे, गणेश बेलमकर यांची एक वर्ष स्वयंसेवक निवड करण्यात आली होती आणि ते परतही आले आहेत. तर यावर्षीसाठी अंकिता लाफसे, शुभांगी निघावे या दोन्ही जर्मनीला. स्वयंसेवक म्हणून गेल्या आहेत. माहेर या संस्थेत सर्व राष्ट्रीय सणाबरोबर लसीकरण मोहीम, आरोग्य शिबिर, रक्षाबंधन, दहीहंडी, सहलीचे आयोजन, महापुरुषांची जयंती, संह अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे संस्थापिका लुसी कुरियन यांनी यावेळी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा हीरा बेगम मुल्ला म्हणाल्या की आम्हाला सर्व स्तरातून मदत होते आणि संस्थापिका लुशी कुरियन जगातील बारा प्रेरणादायी व्यक्तिमत्वा पैकीच एक व्यक्तीमत्व आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
यावेळी मानवी हक्क संरक्षन जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की ,”प्रत्येक नागरिकांनी आपापल्या परीने मदत करून सामाजिक दायित्व जपले पाहिजे, माहेर ही संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात विकलांग आणि पिढीतांसाठी काम करणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था आहे. मॅडमचा आदर्श आपण सर्वांनी घेऊन मदत करण्याचे आव्हान त्यांनी सर्वांना केले आहे.यावेळी विकलांग महिलांनी, मुलांनी टाळ्या वाजवून आम्हाला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली” , त्यावेळी सर्वजण भाऊक होवून रडले.
यावेळी शिवानंद तालीकोटी आणि विश्वंभर लिंगाडे गुरुजी यांनी आपापली मनोगत व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर लिंगाडे गुरूजी यांच्या हस्ते संस्थापिका लुसी कुरियन यांना 51 हजार रुपयेचा चेक देण्यात आला. सत्यनारायण राठी, सुभाष चंद्र शिंदे यांनी पंधरा पेट्या आंब्याच्या दिल्या तर चंदू केदार यांनी 50 किलो साखर दिली .
गहू, ज्वारी, तांदूळ असे एकेक पोते धान्यासह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या .
यावेळी संस्थापिका लुसि कुरियन , अध्यक्षा हिरा बेगम मुल्ला,मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, विश्वंभर लिंगाडे गुरुजी ,सत्यनारायण राठी, शिवानंद तालीकोटी, चंदू केदार, सुभाषचंद्र शिंदे, सुनील चौरे, संगिता जोगदंड,ज्ञानोबा भिंगे, धनंजय पानसरे, सा. का.प्रकाश कोठावळे, माहेरच्या संस्थापिका लुसि कुरियन , अध्यक्षा हिरा बेगम मुल्ला उपस्थित होत्या.