
दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): आष्टी नगरपंचायत अधीनस्त सफाई कामगार कचरा गोळा करता समयी वस्तीतील महिला सोबत असभ्य वर्तणूक करत असल्यामुळे त्यांचेवर कारवाईची मागणी नगरसेवक शेख रेहान यांनी न.पं. मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे याबाबत असे की, कचरा संकलन साफसफाई कामगार नेहमीच मद्य प्राशन करून वस्तीतील महिला सोबत अरेरावी करत हुज्जत घालून अपमानित करतात त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवाय योग्यरीत्या दररोज साफसफाई केली जात नाही, ठरलेल्या वेळेत नियमित कामे करत नाही त्यामुळे अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते यासंबंधी कंत्राटदार व संबंधित अभियंता तक्रारीकडे दुर्लक्ष करतात यासाठी घनकचरा व्यवस्थापनाची पोल खोल करण्याकरता घनकचऱ्याची देयके मासिक सभेत ठेवून त्यावर चर्चा करावी असे जनशक्ती संघटनेचे नगरसेवक शेख रेहान अख्तर हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे