
दैनिक चालु वार्ता परतूर प्रतिनिधी- नामदेव तौर
घनसावंगी तालुक्यातील पोखरा योजनेची अनुदानाची रक्कम होल्ड न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून देण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ घनसावंगी तालुक्याच्या वतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) मा.श्री.नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की शेतकरी सद्यस्थितीत अत्यंत आर्थिक अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पोखरा योजनेअंतर्गत च्या अनुदानाच्या रक्कमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत परंतु तालुक्यातील बँकांनी आलेल्या सदर रकमा शेतकर्यास थकित पिक कर्जामुळे शेतकऱ्यांना न देता होल्ड केलेल्या आहेत सदर रकमा न देऊन बॅकांनी शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यापासून वंचित ठेवलेले आसुन शेतकऱ्यांना जाणुन बुजुन वेठीस धरत आसुन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे तसेच शेतकरी पोखरा योजनेअंतर्गत पुर्व संमती मिळाली की दुकानदारांकडून, रोपवाटिका मधुन ठिबक,रोप उधार/उसनवारी आणुन शेतकरी शेता हे पिक शेतात लागवड केल्यानंतर अनुदानाची रक्कम जमा होई परेंत संबंधित दुकानदाराला आणि रोपवाटीका यांना थांबायचे सांगितले जाते परंतु याच आनुदानाला बॅकांनी होल्ड केल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झालेला असुन या अनुदानाच्या माध्यमातून झालेला खर्च बॅकांनी अनुदान होल्ड केल्यामुळे देने मुस्कील झालेला आहे.
तरी आपणास विनंती आहे की, आपल्याकडुन पोखरा योजनेअंतर्गत येणाऱ्या अनुदानाची रक्कम होल्ड न करता देण्याबाबत कार्यवाही करावी नसता अखिल भारतीय मराठा महासंघ घनसावंगी तालुक्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्यात येईल.
या निवेदनावर मराठा महासंघ घनसावंगी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण यादव,युवक अध्यक्ष गणेश कदम,शुभम कोरडे, गणेश एस काळे, पंढरीनाथ पांढरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.