
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
लातुर /औसा विधानसभा मदारसंघाचे आमदर श्री. अभिमन्यूजी पवार यांच्या संकल्पनेतून आणि क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने औसा येथील उटगे मैदानात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल घटकांच्या कुटुंबातील आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंबातील २५ जोडपे विवाहबद्ध झाले.
याच सामुदायिक विवाह सोहळ्यातच आ. अभिमन्यूजी पवार यांचे चिरंजीव ॲड. परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची कन्या डॉ. चैताली विवाहबद्ध झाले. यावेळी उपस्थित राहून सर्व नवं दाम्पत्यास त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभार्शीवाद दिले.
यावेळी मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. अंबादासजी दानवे, केंद्रीय रेल्वेमंत्री राज्यमंत्री मा.ना.श्री. रावसाहेबजी दानवे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्री. भगवंतजी खुबा यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदयांसह, आजी- माजी खासदार व आमदार आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते