
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर/ ता. प्रतिनिधी
देगलूर येथील छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया हृदयरोग तपासणी, शिबिराचे आयोजन केले आहे.तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय व वेद स्पर्श कार्डियार्ड हॉस्पिटल नांदेड यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिराचा आयोजन करडखेड येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात करण्यात येत आहे.
या शिबिराला तज्ञ डॉक्टर डॉ. रामप्रसाद आखोटिया, डॉ. भारती मढवई, डॉ. सुदाम पवार, डॉ. अर्चना पवार, डॉ. सुजित येवलीकर, या सर्व तज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचा आयोजन आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी 14/05/23 रोजी वेळ सं 9 ते दु 2 पर्यंत या मोफत शिबिराचे लाभ घ्यावे असे आव्हान संभाजी ब्रिगेड देगलूरच्या तर्फे आव्हान करण्यात आले आहे.