
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा
राज्यामध्ये सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय शिंदे सरकारच्या बाजूने दिल्याने”घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य ठरवलं”महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर झाला.खऱ्याअर्थाने जवळपास ११ महिन्यांपासून हा सुरू असलेला सत्ता संघर्षाचा निकाल शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजुने हा सत्याचा विजय आहे.म्हणून तर सत्य परेशान होते परंतु पराजीत नाही ,असे आनंद उद्गार शिवसेना तालुका अध्यक्ष उदयसिंह बोराडे म्हणाले यावेळी फटाक्यांची आतषबाजी करताना भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ
शहरप्रमुख गणेश बोराडे, मा.नगरसेवक संजय गायकवाड, उपतालुकाप्रमुख गजानन कापसे, ॲड.राजेश खरात,लिंबाजी बोराडे, चांदभाई पठाण, बंदुभाऊ बोराडे, भागवत गोंडगे,माऊली वायाळ,अलीम कुरेशी,पवन खरात,तुकाराम तांगडे,कैलास बनकर,गणेश चव्हाण,भारत पाटील,सुनील गुंड,बापूराव वरकड,कृष्ण खराबे,गोकुळ राठोड,विक्रम खराबे,विनोद केंधले, सखाराम खराबे,कृष्णा घोडे व शिवसैनिक